आंबोलीत मटका घेताना एक ताब्यात : मुद्देमालासह रोकड हस्तगत

सावंतवाडी । प्रतिनिधी :
आंबोली येथील बस स्थानक शेजारी मटका जुगार घेताना सांगेली मधलीवाडी येथील दत्तगुरु पांडुरंग सांगेलकर (४९) यांच्यावर कारवाई करत त्याच्याकडील २ हजार २८० रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई आज दुपारी पावणे दोन वाजता आंबोली दूरक्षेत्र चे पोलीस हवालदार अभिजीत कांबळे यांनी केली या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दत्तगुरु सांगेलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.