वेंगुर्ले : प्रतिनिधी
इन्स्पायर अवॉर्ड २०२५-२६ या विज्ञान प्रदर्शनात वेंगुर्ले तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल तुळस या हायस्कूलच्या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
विद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी कुमार गणेश अजित कुंभार याने इलेक्ट्रिक ब्लॅक बोर्ड क्लिनर ही प्रतिकृती बनवलेली होती.
न्यू इंग्लिश स्कूल लांजा जि. रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ८६ प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. यापैकी दहा प्रतिकृती राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवडण्यात आल्या.
यामध्ये गणेश अजित कुंभार याने बनवलेल्या प्रतिकृतीची निवड करण्यात आल्याबद्दल गणेश चे मार्गदर्शक शिक्षक श्री. तुळसकर सर व प्रेरणा देणारे मुख्याध्यापक श्री. कोल्हे सर यांचे विद्यालयाच्या वतीने, तुळस श्रीदेव जैतिराश्रीत संस्था, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, पालक वर्ग, ग्रामस्थ , विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीने अभिनंदन आणि पुढील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरिता शुभेच्छा देण्यात येत आहेत













