क्रिकेट खेळताना घडली दुर्दैवी घटना
मालवण | प्रतिनिधी : सर्जेकोट पिरावाडी येथील निलेश रमेश आडकर (३४) या तरुणाचे सोमवारी सायंकाळी आकस्मित निधन झाले. त्याचा मृत्यू ब्रेन हॅबरेज मुळे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
प्रगतशील मच्छीमार असलेला निलेश आपल्या मित्र परिवारासोबत क्रिकेट खेळत असताना अचानक जमिनीवर कोसळला होता. त्याला मित्रांनी तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातलि मान्यवर उपस्थित होते. त्याच्या पश्चात आई, तीन बहिणी, भावजी, काका, पुतणे असा परिवार आहे.
निलेश याला क्रिकेटची आवड होती तो नेहमी संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. सोमवारी असाच संध्याकाळी क्रिकेट खेळत असताना तो जमिनीवर कोसळला. त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर कुडाळ येथे सिटीस्कॅन केल्यानंतर गोवा येथे त्याला हलविण्यात येत होते. यावेळी वाटेतच त्याचा मृत्यू झाला.