खेडच्या बांदरी पट्ट्यात मध्ये वाळू माफिया जोमात

खेड (प्रतिनिधी) केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सह्याद्रीच्या पट्टयातील बांधरी पट्टयात देवघर – सोंडे या नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजेच इको सेन्सेटिव्ह झोन असलेल्या खेडमधील पूर्वेकडील बांदरी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबवली, तळे विभागात येणाऱ्या गावांमध्ये राजरोसपणे नदीतील वाळूउपसा रात्रंदिवस सुरु आहे

 

या विभागातील देवघर – सोंडे या नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचा व्हीडिओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागला आहे. शेकडो ब्रास वाळूचे ढीगच्या ढीग नदीपात्रात टाकण्यात आले आहेत, यांची वाहतूक रात्रभर या विभागातून सुरु असते.

 

गेली अनेक दिवस देवघर सोंडे परिसरात आणि बांदरी पट्टयातील अस्तान, वडगाव हुंबरी अशा गावांमध्ये या परिसरातील जगबुडी नदीतून अशाच प्रकारे राजरोस वाळूचा • उपसा सुरु आहे. आश्चर्याची बाब म्हणजे महसूल विभाग गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे. गेल्या काही दिवसात अनेकांनी या संदर्भात खेडचे तहसीलदार यांना अवैध चोरट्या वाळू उपशाला आला घालण्यासाठी निवेदने देखील दिली आहेत, मात्र महसूल विभाग जाणीवपुर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक

नागरिकांकडून होत आहे.

 

 

 

डॉ. के कस्तूरी रंगन यांच्या समितीच्या अहवालानुसार पश्चिम घाटातील जिल्ह्यातील ३११ गावांचा समावेश होतो. त्यामध्ये खेड तालुक्यातील ८५ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित आहेत. मात्र आता जैवविविधतेने नटलेल्या खेडमधील सह्याद्रीच्या पट्टयातील जगबुडी नदी सध्या वाळूमाफियांच्या विळख्यात सापडली आहे. देवघर सोंडे ते वडगाव, अस्तान, हुंबरी, या गावांमधून जाणाऱ्या जगबुडी नदीपात्रात च वाळू माफिया अक्षरशः जेसीबी आणि डंपर घेऊन रात्रंदिवस तुटून पडलेले पाहायला मिळत आहेत. त्या विभागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी राजरोस त्या ठिकाणी ये-जा करत असताना देखील एवढी मोठी बाब त्यांच्या लक्षात का येत नाही, की लक्षात येऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,