हापूस आंब्यामध्ये होणारी घुसखोरी थांबवा:शौकत मुकादम

Stop encroachment into hapus mangoes: Shaukat Muqadam

चिपळूण : कोकणातील हापूस आंबा हा संपूर्ण जगामध्ये प्रसिध्द आहे.कोकणाच्या हापूस आंब्यामध्ये आता घुसखोरी होत आहे.कर्नाटक व इतर राज्यामधून येणारा आंबा हा कोकणातील हापूस आंबा आहे असे सांगून छोटया पासून मोठया शहरामध्ये ग्राहकवर्गाची फसवणूक केली जाते.रसायनांचा वापर करुन जबरदस्तीने आंबा पिकवला जातो हे देखील चुकीचे आहे.कोकणातला हापूस आंबा जगामध्ये प्रसिध्द असून त्याच्या मधली घुसखोरी थांबवली गेली पाहिजे अशी मागणी पर्यावरण प्रेमी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे.अवकाळी पावसामुळे कोकणात हापूस आंब्याचे फार नुकसान झाले आहे.त्यामध्ये पुन्हा कर्नाटक येथील आंबे आणून ते हापूस आंबे आहेत असे सांगितले जाते यामुळे बागायतदार व हापूस आंबे खरेदी करणारे ग्राहक यांच्यासमोर ही धोक्याची घंटा आहे.तालुका कृषी अधिकारी व अन्न भेसळ अधिकारी यांनी बाजारपेठेमध्ये फिरून पडताळणी करावी व हापूस आंब्याच्या नावावर श्रेय घेणाऱ्या,फसवणूक करणाऱ्या वर्गावर योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच ही घुसखोरी थांबली नाहीतर बागायतदार अडचणीत येतील असेही शौकत मुकादम यांनी सांगितले.