पालकरवाडी ग्रा.प. येथील कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिरात ७५ रुग्णांची तपासणी

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पालकरवाडी येथे डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय वेंगुर्ला व ग्रामपंचायत पालकरवाडी यांच्या संयुक्त्त विदयमाने घेण्यात आलेल्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिरात ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत पालकरवाडी सरपंच सदाशिव पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सुभद्रा गोसावी सदस्य, यशवंत कापडी सदस्य, रमिता गावडे, विकास अणसुरकर नेत्र रुग्णालयाचे उदय दाभोलकर यांनी सहकारी उपस्थित होते.