बांदा : प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे बांदा येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. आ. रवींद्र चव्हाण यांची प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर प्रथमच ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. चव्हाण म्हणाले, आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी ज्याप्रमाणे आपण करून ताकद दाखवली. तशीच कामगिरी भविष्यात दिसली पाहिजे. त्यासाठी सर्वतोपरी ताकद दिली जाईल, असे सांगितले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, शीतल राऊळ, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगांवकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, मानसी धुरी, प्रियांका गावडे, संदीप मेस्त्री, मनोज नाईक, मंदार कल्याणकर, महेश धुरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, बाळू सावंत, जयेश सावंत, सरचिटणीस मधुकर देसाई, श्याम काणेकर , दादू कवीटकर , सिद्धेश महाजन, शहराध्यक्ष बाबा काणेकर, महेंद्र सावंत, औदुंबर पालव, युवा नेते संदीप बांदेकर, राकेश केसरकर, अभिलाष देसाई, नितीन सावंत, डेगवे सरपंच राजन देसाई, मोहिनी मडगांवकर, मंडल उपाध्यक्ष रुपाली शिरसाट, श्याम मांजरेकर, प्रशांत बांदेकर, स्मिता पेडणेकर, मिसबा शेख, सुकन्या टोपले, रेश्मा सावंत, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, प्रशांत बांदेकर, राजश्री शिंदे, राजु राऊळ, प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, विकी केरकर, प्रविण देसाई, गुरु कल्याणकर, संतोष राऊळ, दिनेश सारंग, संदीप हळदणकर, रोहित नाईक, अशोक माळकर, लवू भिंगारे, निलेश नाटेकर, नारायण कांबळी, सुहास गवडळकर, पपू कदम, संदीप साटम, धोडी चिंदरकर, सुनील राऊळ, बाबली वायगणकर, भूषण सारंग, संजय डिगणेकर, निलेश देसाई, अजय सावंत, ज्ञानदीप राऊळ आदीसह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.











