रंगभरण व चित्रकला स्पर्धेत अत्रेया काणेकर, आदिती सावंत, तन्वी धारगळकर, सुर्यकांत चव्हाण प्रथम

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य

बांदा | प्रतिनिधी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा शहर वतीने भरविण्यात आलेल्या रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बांदा आळवाडा येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानात सदर स्पर्धा संपन्न झाली.

स्पर्धेचे सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे –

(बालवाडी ते इयत्ता दुसरी गट) : प्रथम क्रमांक
अत्रेया नरसिंह काणेकर, द्वितीय प्राची प्रमोद मांजरेकर, तृतीय ज्ञानदा प्रशांत गवस.

(तिसरी ते पाचवी गट) : प्रथम आदिती परेश सावंत, द्वितीय काव्या सूर्यकांत चव्हाण, तृतीय
विहान अरुण गवस.

(सहावी ते आठवी गट) : प्रथम तन्वी नागेश धारगळकर, द्वितीय समर्थ निलेश केसरकर, तृतीय अब्दुलगणी अशरफ अली खान.

(खुला गट) :प्रथम सूर्यकांत गजानन चव्हाण.

विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उप सरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, राकेश केसरकर, केदार कणबर्गी, अक्षय मयेकर, शैलेश केसरकर, गुरू कल्याणकर, सुनील राऊळ उपस्थित होते.