आवडीच्या क्षेत्रात करियर करा ! तहसीलदार वर्षा झाल्टे.

बांदिवडे येथे गोंधळ उत्सवाच्या औचित्यावर शैक्षणिक साहित्य वाटप, जेष्ठ नागरिक, गुणवंतांचे सत्कार!

मसुरे | झुंजार पेडणेकर : अभ्यासा बरोबरच इतर विविध क्षेत्रात यश संपादन करा. पालकांनी आपल्या मुलांची आवडत ओळखून त्यांचे करियर घडवावे. याठिकाणी 80 वर्षावरील गावातील जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करून सामाजिक भान सुद्धा जपण्यात आले आहे. जेष्ठ नागरीक हे वटवृक्षा सारखे असल्याने त्यांचा सन्मान करा. त्यांचे मार्गदर्शन भविष्यात तुमच्या उपयोगी पडेल असे प्रतिपादन मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी येथे केले. बांदिवडे येथील श्री देवी पावणाई भगवती मंदिर येथे दुसऱ्या वार्षिक गोंधळ कार्यक्रमाचे औचित्य साधून दहावी व बारावी परीक्षा गुणवंत विध्यार्थी, व अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, 80 वर्षावरील जेष्ठ नागरिक सत्कार, विविध क्षेत्रातील यशस्वी ग्रामस्थांचा गौरव करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

मुंबई येथील ज्ञानसागर विद्यालयाचे सेवानिवृत शिक्षक व बांदिवडे प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष सोनू सुधाकर सावंत व सहकारी यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दहावी व बारावी गुणवंत विध्यार्थ्यांसह त्यांच्या आई- वडील यांचा सत्कार करण्यात आला. सुमारे 35 जेष्ठ नागरिकांना औक्षण करत भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. बांदिवडे येथील क्रिकेट प्रशिक्षक शाहूलखन बांदिवडेकर, सामाजिक कार्यकर्ते मधुकर श्रीधर परब, आप्पा दिनकर परब, चंद्रकांत परब यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाला. सोनू सावन्त यांनी प्रस्ताविक करताना मुलांच्या गुणगौरव करण्याचा उद्देश सांगितला. यावेळी श्री. साई प्रभु, आप्पा गोविंद परब, दिनेश परब, मधुकर परब, आनंद परब, विश्वनाथ परब, आप्पा दिनकर परब, नारायण परब, चंद्रकांत परब, सागर परब, अनिल परब, मनोहर परब, उदय सावंत, आबा आईर, पोलीस पाटील नरेश मसुरकर, सोनू सावंत, सौ नीता सावंत, राजेंद्र परब,जगन्नाथ परब, शिवराम परब, वासुदेव सावंत, अशोक परब,प्रथमेश नाईक, राजेश दळवी सिताराम परब, प्रकाश परब, लाडोबा परब, सदानंद परब, के.के. सावंत, नयन भट, विनय सावंत, नितीन परब, अशोक परब, उल्हास परब, योगेश सावंत, रमेश परब, राजेंद्र सावंत, सत्यवान सावंत, अनुराधा गावकर, प्रशांत परब, उदय परब, विकास भट, मंगेश चव्हाण, यशवंत परब, उत्तम परब, शैलेश राणे, सुधीर घाडी आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचलन विश्वनाथ परब यांनी केले.