पांगारी हवेली भुरकुंडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे निलेश सुर्वे यांच्याहस्ते भूमिपूजन

गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील पांगारी हवेली भुरकुंडा रस्ता खडीकरण व डांबरीकरणं कामाचे भूमिपूजन नुकतेच भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते पार पडले.
जिल्हा वार्षिक योजना(3054-2025) सन 2024/25 या योजनेतून सदर काम मंजूर झाले असून भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे व भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या प्रयत्नाने सदर रस्त्याचे काम मंजूर झाले असून या कामाचा भूमीपूजन सोहळा नुकताच गुहागर भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या हस्ते पार पडला.मागील अनेक वर्षे या रस्त्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत होती.अखेर हे काम मार्गी लागले आहे.

 

 

 

यासाठी भाजप अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष आसिफ दळवी यांचेदेखील मोलाचे योगदान लाभले.यावेळी भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे,तळवली उपसरपंच व राष्ट्रवादी युवक तालुका सेक्रेटरी संतोष जोशी,दीपक शिलधनकर, मुनाफ दळवी,पांडुरंग गिजे,रामचंद्र लोंढे,शेख उस्मान हसन दळवी,जफार दळवी,नझीर दळवी,इल्यास अलवारे, अश्रफ अलवारे,बशीर अलवारे,शनवाझ अलवारे, शौकत अलवारे, इरफान दळवी,नदीम अलवारे, मझर दळवी तसेच गिजेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या रस्त्याच्या कामाबद्दल सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.