एपीएमसी बाजारात देवगड हापूसला 15 ते 20 हजारांचा दर

नवी मुंबई – नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांचा राजा आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणाहून आंब्याची आवक झाली आहे. यात देवगड हापुसला मोठी पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. देवगड आंब्याच्या पेटीला तब्बल 15 ते 20 हजारांचा दर मिळत असून,अगदी दोनशे रुपये डझन आंब्याची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तर यात तोतापुरी, लालबाग, केरळ वरून आलेल्या आंब्याला दोनशे ते हजार रुपये डझन दर मिळत आहे. मात्र पुढील महिन्यात हे दर घसरणार असल्याची शक्यता आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.