फरा प्रतिष्ठानचे २०२६ चे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर
दोडामार्ग : प्रतिनिधी – ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि समाजहितकारक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘फरा प्रतिष्ठान’तर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. १ मे २०२६ रोजी या पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यामध्ये शिक्षण, कला, कृषी, सामाजिक सेवा आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील एकूण १६ पुरस्कार आणि विशेष सन्मानांचा समावेश आहे. आदर्श पत्रकारिता पुरस्कार दैनिक प्रहार चे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांना जाहीर झाला आहे.
निवड समितीचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.
यंदाचे प्रमुख पुरस्कार आणि मानकरी:
आदर्श शिक्षक फरा पुरस्कार: तेजस बांदिवडेकर (मुख्याध्यापक, सुधाताई कामत प्रा. शाळा नं. २, माठेवाडा-सावंतवाडी).
अध्यापन भास्कर फरा पुरस्कार: श्री. राजेंद्र शिवराम देसाई (मुख्याध्यापक, ओटवणे हायस्कूल, सावंतवाडी).
जीवनगौरव फरा भूषण: श्री. नटकुमार व्यंकटराव पाटील (सिने अभिनेते).
स्नेहा विष्णूस्मृती नाट्यरंग कर्मी पुरस्कार: श्री. केदार सामंत (कुडाळ).
सौ. हेमावती स्मृती महिला स्वावलंबन फरा पुरस्कार: सौ. प्रणाली गावडे (PNG कॅश्यु, माणगाव-कुडाळ).
आदर्श पत्रकारिता फरा पुरस्कार: श्री. संतोष वायंगणकर (संपादक, दैनिक प्रहार, सिंधुदुर्ग).
आदर्श कृषी रत्न फरा पुरस्कार: श्री. संतोष गावडे (रानबांबोळी, ओरोस-कुडाळ).
आदर्श आरोग्य सेवा पुरस्कार: डॉ. संजय का. बर्वे (बांदा, सावंतवाडी).
आदर्श ग्रामसेवा पुरस्कार: सौ. हेमा हरिश्चंद्र नाईक (मोरगाव, दोडामार्ग).
आदर्श स्मार्ट ग्राम/सरपंच फरा पुरस्कार: श्री. सत्यविजय गावडे (सरपंच, अणसुर-वेंगुर्ला).
आदर्श भारतमाता सेवा फरा पुरस्कार: सुभेदार अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री. अजय परब (सरगवे, दोडामार्ग).

इतर महत्त्वाचे पुरस्कार:
याशिवाय शैलजा पांढरे (दिव्यांग प्रेरणा), बाबुराव गवस (भजनीसेवा), दिपेश परब (पत्रकारिता युवा प्रेरणा), पुरुषोत्तम पोखरणकर बुवा (आध्यात्मसेवा), हरिश्चंद्र उर्फ बबन कदम (आदर्श ग्रामरत्न) यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.
नाट्यक्षेत्रात यशस्वी पदार्पण करणाऱ्या कु. प्रथम देसाई (केर) या बालकलाकाराचा आणि संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तन्मय सावंत (हेदुसवाडी) या युवा कलाकाराचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
प्रसिद्धीपासून दूर राहून ग्रामीण भागात निष्ठेने काम करणाऱ्या या सर्व समाजभूषण व्यक्तींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. लवकरच एका भव्य सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे.












