राजापूर l प्रतिनिधी .तालुक्यातील वडवली फौजदार वाडी येथील प्रतिष्ठीत ग्रामस्थ व आंबा बागायतदार भास्कर रामचंद्र शिंदे (६५) यांचे गुरूवारी ३० जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. भाजपा पुर्व मंडळ विभागाचे युवा मोर्चा अध्यक्ष समिर शिंदे यांचे ते वडील होत.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र गुरूवारु दुपारी त्यांना अधिकच अस्वस्थ वाटू लागले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले
भास्कर शिंदे हे मुबईत नोकरीवरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या वडवली गावी आले होते. त्यांनी आंबा बागायती व्यवसाय सुरू करून त्यामध्ये चांगली प्रगतीही केली होती. यामध्ये त्यांचा मुलगा समिर याचाही मोठा सहभाग असे. एक शांत संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची गावात ओळख होते. गावातील सामाजिक कार्यात त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असे. त्यांच्या अकाली निधनामुळे वडवली गावावर शोककळा पसरली आहे. तर वडवली ग्रामस्थ आणि वडवली ग्राम विकास मंडळ,मुंबई याच्या वतीने त्यांना श्रध्दांजली अर्पण् करण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा समिर, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांची अंतयात्रा शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता त्याच्या राहत्या घरातून निघणार आहे.









