विनापरवाना सागाची वाहतुक करणारा टेम्पो ताब्यात

वनविभागाची कारवाई

टेम्पोसह सागवान जप्त

शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील साळशी येथे विनापरवाना साग लाकुड वाहतूक करणारी बोलेरो पिकअप वनविभागाने ताब्यात घेतली आहे.तसेच सागवान लाकुड वाहतूक करण-या दिंगबर गावकर, संजय वळंजू,संकेत तर्फॅ यांच्यावर वनअधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टेम्पो आणि सागवान लाकुड जप्त करण्यात आले आहे.
सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेडी,सहाय्यक वनसंरक्षक डाॅ.सुनिल लाड,कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक रामदास घुगे,आप्पासो राठोड यांनी हि कारवाई केली.
जप्त करण्यात आलेला बोलेरो पिकअप आणि सागवानी लाकुड फोंडा विक्री आगार येथे संरक्षणासाठी ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.