मंत्री नितेश राणे यांच्याकडून चाफेड येथील मेस्त्री कुटुंबीयांचे सांत्वन

शिरगाव (प्रतिनिधी):देवगड तालुक्यातील चाफेड गावचे सरपंच कै.किरण लीलाधर मेस्त्री यांच्या नुकत्याच झालेल्या अकस्मात निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. आज, शनिवारी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी मेस्त्री कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व कुटुंबीयांना धीर दिला.

 

कै.किरण मेस्त्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. त्यांच्या निधनाने उत्तम नेतृत्व गमावल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

 

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, चाफेडचे माजी सरपंच सत्यवान भोगले, आकाश राणे, संतोष साळसकर, आयनल गावच्या सोसायटीचे माजी चेअरमन भालचंद्र साटम, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन साळकर, विजय परब, सत्यवान कांडर, पंढरीनाथ कांडर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.