कु. रिद्धी कांबळी हिची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड
चौके – प्रतिनिधी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाय(थाय बॉक्सिंग) असोसिएशन सिंधुदुर्ग याच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग या ठिकाणी थाय बॉक्सिंग आणि सिलंबंम या शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये चौके हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत सिलंबम (स्टीक फाईट) यामध्ये गट- 14 वर्षे खालील मुलगे कु- मयूर चव्हाण – प्रथम क्रमांक तसेच गट 14 वर्षे खालील मुली कु – किमया चव्हाण -प्रथम क्रमांक तर कु रिद्धी कांबळी -द्वितीय क्रमांक, गट -17 वर्षे खालील मुली यामध्ये कु- आर्या पाटकर – द्वितीय क्रमांक आणि थाय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये गट – 40 ते 44 किलो वजन गट यात कु. आर्या पाटकर – प्रथम क्रमांक, गट – 48 ते 52 किलो वजन गट कु- रिद्धी कांबळी – प्रथम क्रमांक, गट – 40 ते 44 किलो वजन गट कु- मयूर चव्हाण- द्वितीय क्रमांक, गट – 36 ते 40 किलो वजन गट कु – किमया प्रशांत चव्हाण- द्वितीय क्रमांक अशाप्रकारे या विद्यार्थांनी घघववीत यश संपादन केले होते.

यानंतर दि.30 जानेवारी ला सांगली – तासगाव येथे थाय बॉक्सिंग ही विभागीय स्पर्धा पार पडली होती या स्पर्धेमध्ये चौके हायस्कूलची कु- रिद्धी संदीप कांबळी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेला निवड झाली होती या स्पर्धेमध्ये सांगली,सातारा,कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यातले स्पर्धक सहभागी झाले होते या सर्वांवर मात करून कुमारी रिद्धी कांबळी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला, आपल्या शाळेच्या इतिहासात विभागीय स्तरावर आपल्या खेळाडू ने प्रथम क्रमांक मिळविणे ही बाब शाळेसाठी खूप अभिमानाची आहे. यासाठी कु. मृणाल मलये तसेच विवेक राणे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.या संघर्षपूर्ण खेळात तिच्या उत्तुंग कामगिरीमुळे तिचे चौके हायस्कूलच्या मुख्याध्यापिका,सर्व शिक्षकेतर कर्मचारी तसेच चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संस्था,स्थानिक समिती यांच्याकडून कु. रिद्धी कांबळी हिचे अभिनंदन होत आहे.












