गुहागर l प्रतिनिधी :दिनांक – 2 फेब्रुवारी 2025 रोजी श्री गणेश उत्साही मंडळ कर्दे सनगरेवाडी तालुका गुहागर आयोजित प्रथमच मुंबईत नायगाव टिवरीच्या मैदानावर सनगरेवाडी चषक 2025 पर्व पहिले भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उद्घाटन सनगरेवाडीचे ग्रामस्थ श्री प्रकाश पाडदळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच कर्दे गावाचे मानकरी ( गावकर ) नेहमीच नव तरूण युवकांनच्या पाठिशी उभे असनारे सनगरेवाडी (वाडी प्रमुख) – श्री सुरेश पाडदळे, सल्लागार – श्री प्रकाश पाडदळे ,उप. अध्यक्ष- श्री कृष्णा सनगरे अध्यक्ष- कु.आनंद सनगरे, सचिव – संतोष कुरटे, खजिनदार- संजय बडबे , मंडळाचे सदस्य दिलीप पाडदळे, संतोष नाचरे, मंगेश पाडदळे,सुभाष सनगरे,महेश पाडदळे,सुशांत पाडदळे,सुरज पाडदळे,संतोष सनगरे,राजेश सनगरे, नितीन जोशी,मंडळाचे सदस्य स्पर्धेला उत्तम नियोजन केले होते.
सनगरेवाडी चषक 2025 चे मानकरी ठरला.
निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी
बेस्ट गोलंदाज – स्वप्निल घाणेकर चषक आणि टिशर्ट देण्यात आली.
मालिकावीर – नितेश पाडदळे चषक आणि टिशर्ट देण्यात आली.
जय हनुमान क्रिकेट संघ कर्दे वरची वाडी उपविजेता ठरला, बेस्ट फलंदाज – स्वप्निल गावनंग चषक आणि टिशर्ट देण्यात आली या स्पर्धेला प्रमुख पाहुणे श्री मंगेश येद्रे साहेब, श्री निलेश कुळये साहेब, श्री भरत हुमणे साहेब, श्री राजेश येद्रे साहेब, श्री दिनेश येद्रे साहेब असे मान्यववर उपस्थितांचे आभार मानले.
संपूर्ण दिवसभर समालोचक म्हणून कामगिरी बजावली कु.सागर सुर्वे यांच्या मंत्रमुग्ध आवाज ऐकायला मिळाला तर या स्पर्धेचे facebook live Dj सचिन कुळये यांच्या वतीने करण्यात आले होते.तर
या स्पर्धेला लाभलेलं देणगीदारांचे आभार मानले आणि या स्पर्धेची सांगता करण्यात आली.









