शेवरे तांबळवाडी (ता. देवगड) येथे दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी एका शेतकऱ्याच्या नव्या घराला आग लावण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी अनिल सहदेव घाडी आणि विजय सोनू घाडी यांचे विरोधात देवगड पोलीस ठाणे येथे भा. द. वि. कलम ४३६, ४३० व ४२७ खाली गुन्हा नोंद झाला होता. सदर प्रकरणी पोलिसांमार्फत तपास करण्यात येवून ओरोस येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर केस कामी अभियोग पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षी पुराव्यांचा विचार करून व आरोपींचा बचाव ग्राह्य धरून ओरोस येथील सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींतर्फे ॲडव्होकेट श्री. आशिष लोके यांनी काम पाहिले.











