रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील नाखरे-उंबरवाडी येथे दारुच्या नशेत बापाने पत्नी आणि मुलाला शिवीगाळ करत मुलाला कुदळीने मारहाण केली. ही घटना शुक्रवार 7 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वा. सुमारास घडली.
संजय सुधाकर शिंदे (रा.नाखरे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात मुलगा अक्षय संजय शिंदे (28,रा.नाखरे,रत्नागिरी) याने पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री 8 वा. सुमारास त्याचे वडील संजय शिंदे हे दारुच्या नशेत घरी आले. त्यानंतर कोणतेही कारण नसताना त्याने पत्नी आणि मुलगा अक्षयला शिवीगाळ करत अक्षयच्या डाव्या पायाच्या ढोपरावर कुदळ मारुन दुखापत केली.










