श्रीरामवरदायिनी शिक्षण मंडळाचे श्रीरामवरदायिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे आयोजन
गुहागर :
श्रीरामवरदायिनी शिक्षण मंडळाचे श्रीरामवरदायिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निरबाडे येथे इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ संस्थेचे अध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून न्यू इंग्लिश स्कूल पोफळीचे सहाय्यक शिक्षक श्री. प्रदीप कुमार यादव सर उपस्थित होते. श्री. यादव यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये विविध प्रेरणादायी उदाहरणातून विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वी वाटचाल कशी करावी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.
संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप महाडिक, चिटणीस अजय महाडिक, सल्लागार सिताराम घाडगे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. शारदा बेंडाळे, प्राध्यापिका सौ. मानसी भोसले यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपल्या प्रशालेच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम राखावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावीमधील अथर्व चंद्रकांत महाडिक व नूतन नारायण गजमल तसेच इयत्ता बारावीमधील श्रेया लव देसाई, वैष्णवी दिलीप आदावडे, प्रसेंजित जयदीप सावंत आणि ओंकार रवींद्र महाडिक या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पूर्वा महाडिक, स्वरा महाडिक, सिद्धी नवेले, अनुष्का सावंत, पायल पवार आणि संजना माने या विद्यार्थिनींनी इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर इयत्ता दहावी आणि बारावी मधील वेदिका महाडिक, नूतन गजमल श्रेया देसाई आणि वैष्णवी आदवडे या विद्यार्थिनींनी प्रशाले विषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला शिक्षक पालक संघाचे सदस्य श्री. दिनेश महाडिक, श्री. महेश महाडिक, सौ. दीक्षा महाडिक, सौ. विनिता महाडिक, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.











