प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या सुरंगपाणी केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेमध्ये केंद्र सुरंगपाणीच्या शाळास्तरावरील प्रथम क्रमांक प्राप्त मातांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्पर्धा यशस्वी केली .
या स्पर्धेतील
विजेते
सौ दीप्ती दीपक राजापूरकर प्रथम शाळा केंद्रशाळा सुरंगपाणी
सौ निलम न्हानू कसालकर द्वितीय शाळा केळूस फळयेफोडे
सौ नेहा निवृत्ती खोबरेकर तृतीय वायंगणी नं २
सौ स्वरा समिर दाभोलकर – उत्तेजनार्थ शाळा दाभोली नं १
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या केंद्रशाळा सुरंगपाणीच्या सौ दीप्ती दीपक राजापूरकर यांची तालुकास्तरावर होणाऱ्या पाककृती स्पर्धेसाठी निवड झाली.
सहभागी सर्व स्पर्धकांना आदरणीय केंद्रप्रमुख श्री नितीन कदम यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीम. अक्षता अवधूत नाईक व श्रीम नेत्रांकिता वैभव तांडेल यांनी उत्कृष्ट काम पाहिले . त्यांनाही आभारपत्र देऊन गौरविण्यात आले .
या कार्यक्रमाला श्री संभाजी तौर (केळूस फळयेफोडे) ,श्री विक्रम कांबळे (वायंगणी 2 ) श्री दिपेश नाईक (केंद्रशाळा सुरंगपाणी) यांची विशेष उपस्थिती लाभली .
केंद्रमुख्याध्यापिका श्रीम शामल मांजरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .










