मालवण देऊळवाडा येथील घटना
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला अथक परिश्रमांनतर आग आटोक्यात आली मात्र, दुचाकी जळाल्याने मोठे नुकसान झाले, सुदैवाने दुचाकी चालकास कोणतीही दुखापत झाली नाही.
मालवण देऊळवाडा रस्त्यावरून दुपारी एक दुचाकी चालक त्याच्या ताब्यातील टीव्हीएस कंपनीची विगो दुचाकी घेऊन जात असताना दुचाकीच्या मागील बाजूस अचानक आग लागली. ही आग मागील बाजूने येणाऱ्या दुचाकी चालकाच्या लक्षात येताच त्याने त्वरित दुचाकी चालकास सांगितल्याने त्याने दुचाकी थांबवली. ही आग वाढतच जाऊन दुचाकीचा मागील भाग व सीटचा भाग अगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी माती, पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र भडकलेली आग विझेपर्यंत दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. ही आग दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या पेट्रोलच्या टाकीला लागल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला जात आहे











