सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील ज्येष्ठ व्यापारी वासुदेव शंकर माने
(वय ८४, रा.सालईवाडा,सावंतवाडी )
यांचे रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, दोन जावई, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. व्यापारी उमेश व वसंत माने यांचे ते वडील होत.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी सावंतवाडी शहरात भांड्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नामांकित व्यावसायिक म्हणून ते नावारूपाला आले होते. राणी जानकीबाई साहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाचे ते संचालक होते. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.











