पाल गावातील विविध विकास कामांसाठी सुमारे ७० लाखांच्या कामांना मंजुरी

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन संपन्न

 

वेंगुर्ले : दाजी नाईक

वेंगुर्ले तालुक्यातील पाल गावातील विविध विकास कामांसाठी सुमारे ७० लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. भाजपा तर्फे गावातील ही कामे मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन कार्यक्रमाला पाल गावच्या सरपंच कावेरी गावडे, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे, बूथ अध्यक्ष प्रदीप मुळीक, बूथ केंद्र प्रमुख संदीप नाईक, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत गावडे, विनिता गावडे, स्नेहल पालकर, शामल केरकर तसेच कार्यकर्ते संजय पालकर, मनोहर गावडे, माजी सरपंच गुरुनाथ बर्वे, नाना गावडे, प्रमोद गोडबोले, वरद गोडबोले, अच्युत परब, बाबलो केरकर, नाना मोघे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

पाल गावामध्ये मंजूर झालेल्या कामांमध्ये पाल मातोंड रस्ता डांबरीकरण १७ लाख, मिरखोल वळण बंधारा १५ लाख, तुळस पलटड रस्ता बांधणे ५ लाख, पाल खालचीवाडी पायावट करणे १० लाख, अंबाई कॅशू फॅक्टरी रस्ता १० लाख, झेंडोबा रस्ता ५ लाख, पाल येथे ट्रान्सफार्मर बसविणे १० लाख या कामांचा समावेश आहे. लवकरच ही कामे पूर्ण होऊन त्याचा लाभ पाल गावातील ग्रामस्थांना होणार आहे.

पाल गावातील विकास करण्यासाठी भाजपा नेहमीच प्रयत्नशील आहे. या भागातील विकास कामे रखडणार नाहीत आणि विकास कामांसाठी नीधीची कमतरता भाषणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले. शेवटी अध्यक्ष श्री दळवी व उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे भाजपा शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे यांनी आभार मानले.