कुडाळ (प्रतिनिधी)
कुडाळ येथील प्रतिथयश वकील अॅड.अमोल सुरेश सामंत डिंगे यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड.अमोल सामंत डिंगे हे कुडाळ येथे वकीली करतात. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी वकील म्हणूनही यापूर्वी काही वर्षे काम पाहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक तालुका न्यायालय व जिल्हा न्यायालयामध्ये देखील त्यांनी आपला वकिली व्यवसाय केला आहे. आपल्या अशिलांना न्याय मिळवून देणारे सर्वसामान्य जनतेचे वकील म्हणून अॅड. अमोल सामंत डिंगे यांची यांची विशेष ओळख आहे. नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड.अमोल सुरेश सामंत डिंगे यांचे अभिनंदन केले जात आहे.












