
खेड (प्रतिनिधी) सीएसएमटी मुंबई स्थानकातील फलाट क्र. १२ आणि १३च्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे पुन्हा मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेससह मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस ३१ मार्चपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. सोमवारपासून या दोन्ही गाड्या ३१ मार्चपर्यंत पुन्हा दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेसही ३१ मार्चपर्यंत ठाणे स्थानकातपर्यंतच धावणार आहे.










