पाली | प्रतिनिधी :
आज दिवसभर उकाड्याने हैराण होत असताना रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक ढगांचा गडगडाट होऊन रत्नागिरी तालुक्यातील पाली, खानू, वळके, चरवेली,नाणीज या भागात अवकाळी पाऊस कोसळू लागला.उकाड्यासाठी तात्पुरता दिलासा असला तरी आंबा,काजू सह कोकणी रानमेवाचे यासाठी मात्र हा पाऊस हानिकारक असून बागायतदारांना या पावसाचा नक्की फटका बसू शकतो.पाली बाजारपेठेत मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर या दोन्हीही राष्ट्रीय महामार्गावरील कामे सुरू असल्याने काही ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला आहे.








