पाणीपट्टी न भरणाऱ्यांची कनेक्शन केली बंद
वैभववाडी | प्रतिनिधी
मार्च अखेरीस वाभवे – वैभववाडी न.पं. ने कर चुकविणा-यांना चांगलाच दणका दिला आहे. शहरातील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी असणाऱ्या मालमत्ता धारकांवर कारवाईचा बडगा नगरपंचायतीने उगारला आहे. या अंतर्गत शहरातील 15 थकीत नळ कनेक्शन बंद करण्यात आली आहेत. तसेच 10 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व वॉरंट जारी करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात संबंधित मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कर नगरपंचायत कार्यालयात भरणा करावा अन्यथा सदर मालमत्ताधारकांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीच्या वतीने सांगण्यात आहेत. तरी नागरिकांनी आपल्या मालमत्तेवर जप्तीची वेळ येऊ न देता त्वरीत थकीत कराचा भरणा न.प. कार्यालयात करावा असे आवाहन न.पं. या वतीने करत आहे.










