आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीतर्फे मोफत वस्तूंचे वाटप

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीतर्फे गावातील रहिवाशांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यामध्ये कपडे व भांडी घसण्याचा साबण,केरसुणी,कम्फर्ट,आदी वस्तूंचा समावेश आहे.हा लक्षवेधी उपक्रम आंबव पोंक्षे ग्रामपंचायती मार्फत राबवण्यात आला.सहा महिन्यांपूर्वी एकदा अशाच गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले होते.
यासाठी सरपंच शेखर उकार्डे,उपसरपंच मंगेश मांडवकर,सदस्य सौ प्रिया सुवरे,सौ निधी भायजे, सौ दीपाली कुडतडकर,श्री सुनील घडशी,सौ रिया मायनक,ग्रामसेवक सौ एल एस गावित,शरद जाधव,सौ पूर्वा भुवड,अनघा नेटके यांनी मेहनत घेतली.
दरम्यान या वाटपा वेळी गावकरी,मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.