मालवण | प्रतिनिधी : क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाज मुंबई, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सावंतवाडी येथील वेरले फौजदार वाडी गावातील घर जळीतग्रस्त शितल भिकाजी घाडी आणि संजय राघो घाडी या समाज बांधवांना आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली. सदर मदत शिरवंडे गावातील जेष्ठ नागरिक व समाज प्रेमी चंद्रकांत बाळू गावकर, रमेश अर्जुन गावकर, कैलास घाडीगावकर व सुरेश अंकुश गावकर यांनी समाज बांधवांकडून दातृत्वाच्या सहभागातून जमा केली. त्याबद्दल घाडीगावकर समाज मुंबई, सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने शिरवंडे ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य घाडीगावकर समाज अध्यक्ष घनश्यामजी गावकर, सिंधुदुर्ग विभाग अध्यक्ष सूर्यकांतजी घाडी, सचिव प्रदीप घाडी, सदस्य कैलास घाडीगावकर, सदानंद घाडीगावकर, सत्यवान घाडीगावकर तसेच शिरवंडे येथील कार्यकर्ते व भांडुप उपाध्यक्ष सुरेश गावकर, चंद्रकांत गावकर, रमेश गावकर तसेच अंधेरी विभाग सदस्य प्रमोद गावकर, वेरले येथील गणेश घाडी, शशिकांत घाडी, प्रकाश घाडी, चंद्रकांत घाडी, सूर्यकांत घाडी, संजय घाडी उपस्थित होते.












