वेंगुर्ले l प्रतिनिधी, हिंदुधर्माभिमानी, वेंगुर्ला आयोजित गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन रविवार श्री रामेश्वर मंदिर, वेंगुर्ला येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार अभिनया सह वेशभूषा करत परिक्षकांची मने जिंकत उज्ज्वल यश संपादन केले.
या वेशभूषा स्पर्धेत दहावी इयत्तेतील कु. महिमा रुपेश नार्वेकर हिने गांधीची भूमिका करत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तरी या स्पर्धेत याच विद्यालयाची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी प्राजक्ता अनिल भोकरे हिने सुद्धा गांधारी हे पात्र साकारत चतुर्थ क्रमांक मिळवला
या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना उपक्रमशील अध्यापक प्रा वैभव खानोलकर ,सौ मोहिते मॅडम आणि लिपिक अजित केरकर यांसह पालकांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाची ही यशाची पंरपरा कायम राखत वेंगुर्ले येथे संपन्न झालेल्या वेशभूषा स्पर्धेत यश मिळवत शाळेच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या विजेत्या स्पर्धकांचे विशेष अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री विरेंद्र कामत -आडारकर
उपाध्यक्ष निवृत्त गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर, सचिव रांगोळीकार रमेश नरसुले ,सदस्य निलेश मांजरेकर आणि इतर सर्व संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ यांनी केले असुन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध निवेदक तसेच मुलाखतकार,
उपक्रमशील अध्यापक वैभव खानोलकर यांच्या सह सौ मोहिते मॅडम व लिपिक अजित केरकर व या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचे ही विशेष अभिनंदन केले आहे
सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत यश मिळवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाचे या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.










