KHED: घेरापालगड शिंदेवाडी पाणी अडवा पाणी जिरवा चा प्रत्यक्ष केला अवलंब, महिलांचा पुढाकार

Gherapalgad Shindewadi Pani Addwa Pani Jirwa was actually adopted, an initiative of women

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यातील घेरा पालगड शिंदे वाडी येथील माहेरवाशिणी सौ मंजिरी मोरे या मागील काही वर्षापासून पाणी फाउंडेशन या संस्थेत कार्यरत आहेत त्यातून मिळालेल्या प्रेरणेतून आपल्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या माहेरी धाव घेतली त्यानंतर त्यांनी आपले भाऊ तसेच ईतर नातेवाईक यांना ही संकल्पना समजावून सांगत पाणी अडवा , पाणी जिरवा चा अवलंब केला असून त्याचा जणू काही आदर्श घालून दिला आहे

याबाबत ग्रामपंचायत मध्ये सभा आयोजित करण्यात आली नंतर शिंदे वाडी येथील डोंगर माथ्यावर पडणारे पाणी जमिनीत झिरपले पाहिजे यासाठी त्या ठिकाणी सी सी टी खड्डे मारण्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. शिंदे वाडी येथील रहिवाशी श्री जगदीश शिंदे यांच्याकडे या विषयावर चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या नोकरदार वर्गाला आव्हान केलं आहे की प्रत्येकाने १ हजार रुपये जमा करायचे आणि श्रमदान मोहीम मध्ये ही सहभागी व्हावे . बरेचसे चाकरमानी शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्याने श्रमदानाला येत आहेत . आम्ही सुरुवात केली आहे आपणही सहभागी व्हावे अशी विनंती सौ मंजिरी मोरे यांच्या माध्यमातून जल फाउंडेशन कडे केली आहे.

भविष्यात या डोंगरात लागवड केली जाणार आहे अशी माहिती जगदीश शिंदे यांनी दिली .