सावंतवाडी: वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार दि. ११ एप्रिल पासून सोमवार दि. १३ एप्रिलपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता पाककला स्पर्धा
त्यानंतर ६.३० वाजता कपिल कांबळी यांचा कार्यक्रम व होम मिनिस्टर स्पर्धा तर दिनांक १२ रोजी हनुमान जन्मोत्सवा दिवशी सकाळी ८ वाजता ह. भ. प. सौ. ललिन तेली यांचे श्री हनुमान जन्मावर आधारित सुश्राव्य कीर्तन, हनुमान जन्मोत्सव, दुपारी ३ वाजता श्री सत्य नारायण महापुजा, महाआरती, भजन व त्यानंतर देवगड नाद भोळेवाडी येथील ब्राह्मण देव महिला मंडळाचे समई नृत्य
तसेच त्यानंतर वैश्यवाड्यातील कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
तर सोमवार दि. १३ रोजी इन्सुली येथील महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचे संत सखू साठी विठ्ठल सखू झाला हा ट्रिक सीन युक्त नाट्य प्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमंचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.वैश्यवाड्यात हनुमान जन्मोत्सवानिमित्त समई नृत्य व विविध कार्यक्रम
सावंतवाडी: वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शुक्रवार दि. ११ एप्रिल पासून सोमवार दि. १३ एप्रिलपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता पाककला स्पर्धा
त्यानंतर ६.३० वाजता कपिल कांबळी यांचा कार्यक्रम व होम मिनिस्टर स्पर्धा तर दिनांक १२ रोजी हनुमान जन्मोत्सवा दिवशी सकाळी ८ वाजता ह. भ. प. सौ. ललिन तेली यांचे श्री हनुमान जन्मावर आधारित सुश्राव्य कीर्तन, हनुमान जन्मोत्सव, दुपारी ३ वाजता श्री सत्य नारायण महापुजा, महाआरती, भजन व त्यानंतर देवगड नाद भोळेवाडी येथील ब्राह्मण देव महिला मंडळाचे समई नृत्य
तसेच त्यानंतर वैश्यवाड्यातील कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
तर सोमवार दि. १३ रोजी इन्सुली येथील महापुरुष दशावतार नाट्य मंडळाचे संत सखू साठी विठ्ठल सखू झाला हा ट्रिक सीन युक्त नाट्य प्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमंचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे.