बांदा : प्रतिनिधी
डेगवे – आंबेखणवाडी येथील उल्हास बाबाजी देसाई (वय ६५) यांचे रविवारी मुंबई येथे राहत्या घरी निधन झाले. आज सोमवारी डेगवे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
उल्हास देसाई यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान होते. डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई या संस्थेचे ते सरचिटणीस होते. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गावात नंदादीप वाचनालयाची स्थापना केली होती. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सदस्य होते. श्री स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरण कामात त्यांचे योगदान होते.
आंबेखणवाडी कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध विकासकामांना गती दिली होती. मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते. गावच्या विकास कामात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी गौरव केला गेला. विक्रीकर निरीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.
त्यांच्या पश्यात दोन मुलगे, सुना, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.
—-













