माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांना विशेष निमंत्रण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन
सिंधुदुर्ग : रिजनल वर्कशॉप, जयंती मंडळ नांदेड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त समाजाच्या हितासाठी व विकासासाठी नियमित कार्यतत्पर असणारे
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांची मुलुख मैदान तोफ नांदेड येथे गरजणार आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन आणि पंचरंगी ध्वजारोहण होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्र.प्र. देशमाने (अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नांदेड) असतील.
तर याप्रसंगी प्रमुख उपस्थिती द.रा. सावंत, एम.डी. सुर्यवंशी, ई.एम. आत्राम, एस.एच. गेडेवाड, एस.एन. सुभेदार, आनंद बिरादार, चंदा बुक्तरे, नवनाथ पिसुटे, एन.जी. सिरसाठ, एन.टी. मस्के, एस.बी. निरतंर, अकुंश जाधव यांची असेल.
अंकुश जाधव यांनी अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाल्यानंतर संघर्षातून आपले जीवन घडवले. शिक्षणानंतर लहान मोठे काम व त्यानंतर पत्रकारितेतून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. हे करत असतानाच सामाजिक क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी व समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये निवडून गेल्यानंतर समाज कल्याण सभापती या नात्याने त्यांनी विविध विकासकामे मार्गी लावली. आपल्या स्थानिक भागातील प्रश्न सोडवण्याबरोबरच जिल्हा स्तरावरील अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. परखड लिखाण व ओजस्वी असे वक्तृत्व यामुळे त्यांची एक वेगळी ओळख व धबधबा निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर नांदेड येथे त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
त्या सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर व्याख्यान (दि. २१ एप्रिल ): कुणाल वराळे प्रस्तुत व्याख्यानाचे अध्यक्ष मा.प्र.प्र. देशमाने असतील. व्याख्याते मा.प्रा.डॉ. गोणारकर, संचालक मा.सं.स्वा.रा.म.वि. नांदेड हे “आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार आणि वारसा” या विषयावर बोलतील. स्थळ: यांत्रिकी मंडळ सभागृह, नांदेड.
* भीम-बुद्ध प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम (दि. २२ एप्रिल , सायंकाळी ६ वा.): स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी मैदान, रिजनल वर्कशॉप, नांदेड.
आयोजक:
चंदा बुक्तरे (अध्यक्षा), इंजि. अमोल पतंगराव (कार्याध्यक्ष), प्रसाद पांडे (सचिव), इंजि.एस.डी. मात्रे (कोषाध्यक्ष), अर्चना मेघमाळे (उपाध्यक्षा), सुरजकुमार जटाळे (उपाध्यक्ष), इंजि. अविनाश शिनगारे (उपाध्यक्ष), दिपक भोळे (सहसचिव), शे. इस्माईल शे. इब्राहिम (सह कोषाध्यक्ष), महेश गुर्लेवाड (संघटक), विनोद चव्हाण (संघटक), मनोहर कांबळे (संघटक), सुधाकर गरुड (संघटक), शेख निसार (संयोजक), दत्ता मस्के (संयोजक).
हा सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देणारा ठरेल.












