खेड(प्रतिनिधी) खेड-भरणे मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. विशेषतः प्रबोधनकार ठाकरे उद्यान ते महाडनाका परिसरात पादचाऱ्यांची नेहमीच रहदारी सुरू असते. या मार्गावरील पथदीप बंद असल्याने अंधारातूनच मार्गक्रमण करण्याची वेळ पादचाऱ्यांवर येवून ठेपली आहे. यामुळे अपघातांचा धोकाही कायम आहे.
खेड-भरणे मार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. आधीच हा मार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी देखील होत आहे. त्यातच रस्त्यालगत बस्तान ठोकणाऱ्या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रसंगी वाहतूक कोंडीही होत आहे. यात सायंकाळपासून रात्रीपर्यंत बंद असणाऱ्या पथदीपांची भर पडली आहे.
प्रबोधनकार ठाकरे उद्यानापासून एसटी आगारपर्यंतचे पथदीप गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. नगरप्रशासनाला या प्रश्नी लक्ष घालण्यास सवड मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.











