खेड पोलीस ठाणे नूतनीकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

खेड(प्रतिनिधी)शासनाच्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत तालुका दौऱ्यावर आलेल्या जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी खेड पोलीस ठाण्याच्या नूतनीकरणासह सुशोभिकरण कामाची पाहणी केली.
शासनाच्या १०० दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत अवघ्या दीड महिन्यातच लोकसहभागातून पोलीस ठाण्याला नवा साज देत अंतर्गत कामे पूर्ण केली. रंगरंगोटीसह विजेची यांत्रिक उपकरणे, वीज व्यवस्था, स्वतंत्र पाण्याच्या साठवण टाक्या, स्वतंत्र स्वच्छतागृहासह शौचालयाची उभारणी केली आहे. स्वतंत्र अभ्यागत कक्ष, माहिती फलकासह पोलीस ठाण्याला चढलेला नवा ‘लूक’ पाहून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी। पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांचे कौतुक केले. याप्रसंगी प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार सुधीर सोनावणे उपस्थित होते.