राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रेडी येथे दरवर्षी दशावतारी नाट्य महोत्सव घेणाऱ्या प्रितेश राऊळ मित्र मंडळाचे कौतुक

भाजप महिला जिल्हा अध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांचे गौरवोद्गार

वेंगुर्ले | प्रतिनिधी : कोकणचे नेते नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी दशावतारी नाट्य महोत्सव रेडी येथे होतो. प्रितेश राऊळ मित्र मंडळाचे हे आयोजन कौतुकास्पद आहे. रेडी गावातील ग्रामस्थ आणि नाट्यप्रेमींकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून आनंद झाला असे प्रतिपादन भाजप महिला जिल्हा अध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांनी रेडी येथे केले. दरम्यान महोत्सवाच्या चौथ्या दिवशीही नाट्यप्रयोगाला नाट्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रितेश राऊळ मित्र मंडळ पुरस्कृत व दशावतार कलाप्रेमी ग्रुप, रेडी आयोजित दशावतार नाट्यमहोत्सवला प्रत्येक वर्षी उदंड प्रतिसाद मिळत आहे. रेडी येथील या भव्य दशावतार नाट्य महोत्सवाच्या व चौथ्या दिवशी सौ. कोरगावकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी जिल्हा परिषद सभापती सौ. गावकर, माजी जि. प. सदस्य दादा कुबल, जिल्हा भाजप युवा मोर्चा चे तुषार साळगावकर, भाजप पदाधिकारी शेखर गावकर, वसंत तांडेल व अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित यांचे माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ व सरपंच रामसिंग राणे यांनी स्वागत केले