The ruling and administration failed to find an answer to the water shortage in the month of May in the Nagar Panchayat jurisdiction.
मंडणगड | प्रतिनिधी : मे महिन्यात नगरपंचायत कार्य क्षेत्रातील विहीरींचे पाणी साठे उद्भवातून आटल्याने पाणी टंचाईची या समस्येची तीव्रता वाढत चाललेली आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने केलेले तत्कालीन उपायही अपुरे पडल्याने नागरीकांना पिण्याच्या पाणी व वापराचे पाणी याकरिता नागरीकांना संर्घष करावा लागत आहे. महिला वर्गाची अडचणी वाढलेल्या असताना शहरातील विविध प्रभागात दोन ते चार दिवस इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाणी पुरवीले जात आहे. पुरवण्यात येणार पाणी हे शासनाच्या नियमाप्रमाणे माणसास जीवनावश्यक असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेच्या निकषांपेक्षा खुपच कमी असते. शहरवासीय डोळ्यात प्राण आणून मान्सनुची प्रतिक्षा करत आहे. कारण मंडणगड ची जीवनदात्री असणारी निवळी नदीही यंदा पुर्णपणे आटली आहे. त्यामुळे मंडणगड व कोंझर य दोन्ही गावात यंदाचे पाण्याचे दुर्भिक्ष असल्याची परिस्थिती आहे. मंडणगड कोंझर येथील धनगरवाड्यांमध्ये परिस्थिती बिकट असल्याने शासनाने शहरात निदान शेवटच्या आठवड्यात तरी टँकरने पाणी पुरवठा करा अशी येथील नागरीकांची मागणी असताना नगरपंचायत प्रशासनाने टँकरच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
राजकारणी व सत्ताधाऱ्यांनी शहराचा पाणी प्रश्न चाळीस वर्षे सोडविला नाही. आता काहीच न करता प्रशासन नागरीकांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. पाणी प्रश्नाची तीव्रता इतकी खोल आहे की परिस्थिती कधीही हाताचे बाहेर जावू शकते. प्रत्येक वेळ सत्तेत येणाऱ्यांना नवा इतिहास घडवण्याची मोठी संधी असताना ते मात्र इतिहासाची पन्नरावृत्ती करतात. पाणी प्रश्नाच्या नियोजनासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीचे विनियोगाची गाजरे जनतेला दाखवितात व यात पाच वर्षे कधी जातात ते जनतेला कळत नाही. सध्या थोड्याथोडक्या नव्हे तर तेहतीस कोटी रुपयांच्या खर्चाचे नळपाणी योजनेची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यंदा मे महिन्यात पाणी टंचाईचा शहरवासीयांना सामना करवा लागू नये याकरिता प्रशासनाने तीन महिने आधीचे नियोजन केले होते याकरिताना वनराईबंधाऱ्याची मोहीम हाती घेण्यात आली होती मात्र मे महिन्यात पाणी वापर अधिक असतानाही उन्हाच्या लाहीने शहरवासीयांची पाण्यासाठी वणवण थांबलेली नाही. 29 मे 2023 रोजी नगरपंचायतीची सर्वसाधरण सभा संपन्न होणार असल्याने सत्ताधारी व विऱोधक या प्रश्नावर काय भुमीका घेतात याकडेही नागरीकांचे लक्ष लागले आहे











