पेडणे (प्रतिनिधी) : मोरजी येथील श्री सातेरी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी भक्तिरंग नृत्याचा अविष्कार सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मनी जिंकली.
नाट्यरंभ स्कूल ऑफ आर्ट्स शेकडो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत विविध कार्यक्रमांतून नृत्याविष्कार सादर केले आहेत. नृत्य शिक्षिका वैष्णवी जोशी यांनी भरतनाट्यम कलेत शेकडो विद्यार्थी घडविले आहेत. मानसी शिरोडकर, आरल मोरजे, आशी मोरजे, निर्वी पडते, आद्या फडते, साची राऊत, साची हरमलकर, आर्वी शेटगावकर, करिष्मा शेटगावकर, निशा शिरोडकर, अदिती कोरगावकर, नेहा कोरगावकर, दिव्या ढोणे, सृष्टी सावंत, सृष्टी आश्वेकर, वरदा शेटगावकर, प्रियल पवार, आराध्या दाभोलकर, श्रीया तेमकर, हर्षाली हलनकर, मानवी शेटगावकर, मनस्वी शेटगावकर, ऐश्वर्या वडार, आर्या बांदेकर, शैवी लाड, साईछा चोडणकर, लक्षिका चोडणकर,
नंदिशा गावकर, स्मृती सळगावकर, गरिमा साळगावकर आदी कलाकारांनी नृत्य सादर केले.
त्यात गणेश वंदना, चामुंडा स्तुती, कोळी नृत्य, गणेश कौतुकम, शारदा स्तुती, शिव स्तुती, देवी स्तुती, सातेरी वंदना, नांदी, वराह रुपम, सूर निरागस हो, त्रिदेवी स्तोत्र सादर केले. प्रास्ताविक, स्वागत आणि सूत्रसंचालन श्रेया महेश फडते यांनी केले.












