*रत्नागिरी, : नारळ पिकातील उत्कृष्ट कार्य केले असेल अशा शास्त्रज्ञ, बागायतदार, उद्योजक किंवा कलाकार यांना कै. सुनंदा आणि शंकर महादेव भाटकर कल्पवृक्ष मित्र पुरस्कार देण्यात येणार असून, सन 2024, सन 2025 या दोन वर्षातील मानांकनासाठी दि.13 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्येच्या कृषिविद्यावेत्तांनी केले आहे.*
पुरस्कारासाठी उमेदवारांनी, संस्थेने शिफारशीत केलेले अर्ज प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता.जि. रत्नागिरी यांच्याकडे पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. किरण मालशे, कृषिविद्यावेत्ता, प्रानासंके भाट्ये – मो.क्र. 94058586056 यावर संपर्क साधावा.
000











