राज्यस्तरीय शालेय थाय बॉक्सिंगमध्ये चौके हायस्कूलच्या रिद्धी कांबळी हिचा दुसरा क्रमांक

रिद्धी कांबळी हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

चौके – प्रतिनिधी :- नाशिक अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत थाय बॉक्सिंग क्रीडा प्रकारात मालवण तालुक्यातील चौके भ.ता.चव्हाण, म. मा.विद्यालय चौके या प्रशालेची विद्यार्थिनी रिद्धी संदीप कांबळी हिने थाय बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सांगली,सातारा,कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते. कुमारी रिद्धी कांबळी हिने यापूर्वी जिल्हास्तरीय स्पर्धा ओरोस येथे जिल्हा क्रीडा संकुल मध्ये पार पडलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यानंतर विभागीय स्पर्धा सांगली येथे झाली या स्पर्धेमध्ये, सांगली,सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातून खेळाडू सहभागी झाले होते या सर्व खेळाडूंमधून कुमारी रिद्धी कांबळी हिने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता त्यानंतर दिनांक 29/4/2025 रोजी अहिल्यानगर नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रा मधून खेळाडू सहभागी झाले होते, या स्पर्धेत अंतिम सामन्यात पर्यंत धडक मारून संपूर्ण महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

यासाठी तिचे प्रशिक्षक श्रीम. मृणाल मलये आणि क्रीडा शिक्षक श्री अनिल आचरेकर यांचे सहकार्य मिळाले, रिद्धी कांबळी हिच्या या यशाने चौके हायस्कूल चा नावलौकिकात भर पडली असून चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई, चौके हायस्कूल स्थानिक संस्था,प्रशालेच्या मुख्याध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह संपूर्ण चौके पंचक्रोशीतून रिद्धी कांबळी हिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे