मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेअंतर्गत वेंगुर्ले येथे शाळांचा सन्मान

वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालयात झाला सोहळा..

वेंगुर्ले l दाजी नाईक :मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्र.१ (२०२३ – २०२४) आणि टप्पा क्र.२ ( २०२४-२०२५) अंतर्गत शासनस्तर आयोजित स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील क्रमांक प्राप्त शाळांना आज मंगळवारी

वेंगुर्ले पंचायत समिती सभागृह येथे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. टप्पा क्र. १ मध्ये शाळा मठ नंबर २ व शिरोडा हायस्कूल प्रथम तर टप्पा क्र. २ मध्ये केंद्र शाळा वेतोरे नंबर १ व विद्यामंदिर परुळे ने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

शासनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये टप्पा क्रमांक १ प्राथमिक स्तर : प्रथम जि. प. पू. प्रा शाळा मठ नंबर २ , द्वितीय जि. प. पु. प्रा. शाळा वेतोरे नंबर १, तृतीय जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मातोंड मिरिस्ते.

माध्यमिक स्तर : प्रथम गुरुवर्य अ.वि बावडेकर विद्यालय शिरोडा, द्वितीय वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला, तृतीय अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे.

टप्पा क्रमांक २ अंतर्गत प्राथमिक स्तर : प्रथम जी.प. प्राथमिक केंद्र शाळा वेतोरे नंबर १, द्वितीय जि. प. पू. प्राथमीक शाळा वजराट नंबर १, तृतीय जि. प. पू. प्रा. शाळा आरवली नंबर १. माध्यमिक स्तर : प्रथम अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे, द्वितीय श्री शिवाजी हायस्कूल तुळस, तृतीय डॉ.रा.धों. खानोलकर हायस्कूल मठ.

तसेच टप्पा क्रमांक २ मध्ये मठ शाळा नंबर २ ने गुणानुक्रमे तालुकास्तरावर प्रथम प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. ती शाळा जिल्हास्तरावर सहभागी झाली होती. जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्या शाळेचाही सन्मान करण्यात आला. शासनामार्फत

या बक्षीसपात्र शाळांना अनुक्रमे तीन लाख, दोन लाख व एक लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले आहे. तसेच जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त मठ शाळा नं.२ ला तीन लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले आहे.

यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, विस्तार अधिकारी सखाराम सावंत, बालविकास प्रकल्प अधिकारी शर्मिष्ठा सामंत, विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, केंद्रप्रमुख लवू चव्हाण, महादेव आव्हाड, परुळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन माने, केंद्रप्रमुख विठ्ठल तुळसकर, श्री. कदम आदी उपस्थित होते. तसेच केंद्रप्रमुख, सर्व बक्षीसपात्र शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संघटना प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद टिळवे यांनी व श्री.कदम यांनी आभार मानले.