महिनाभरापूर्वी परटवणे येथे रस्ता ओलांडणताना घडला होता अपघात
रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील परटवणे येथे रस्ता ओलांडणार्या मुलीला धडक देणार्या देणार्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची ही घटना 2 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली होती.
यश मंगेश शिवलकर (20, रा. सड्ये शिवलकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रत्नागिरी शहर पोलिसाकडून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. यश हा 2 मार्च रोजी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच 08 एआर 9048) घेवून शहरातील परटवणे येथून जात होता. सायंकाळी 6 वा.च्या सुमारास रस्ता ओलांडणार्या मुलीला त्याच्या ताब्यातील दुचाकीची धडक बसली. श्राव्या हर्षद धुळप (7, रा. परटवणे रत्नागिरी) असे जखमी मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याप्रकरणी यश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









