खेड (प्रतिनिधी)कोकण रेल्वे मार्गावरील भोस्ते बोगद्यानजीक नेत्रावती एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे.
मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी येथील पोलीस यंत्रणेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह आढळलेल्या ठिकाणी ओळख पटवण्यासारखे पोलिसांना काहीच सापडलेले नाही. घटनास्थळी केवळ त्याची चप्पलच पोलिसांच्या हाती लागली. यामुळे मृत तरुणाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. भोस्ते बोगद्यानजीक रेल्वेच्या धडकेने मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास येथील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले आहे.











