खेड(प्रतिनिधी)येथील पोलिसानी शुक्रवारी खेड शहरा सह लोटे येथे टाकलेल्या धाडीत रोकड जप्त करत दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लोटे एमआयडीसीतील चिपळूण खेड तालुका व्यवसाईक संघ यांचे कार्यालया समोरुन जाणारे डांबरी रस्त्याच्या कडेला
सचिन सुरेश जाधव वय – ३६ वर्षे रा. पर्शुराम दुर्गवाडी ता. खेड हा कल्याण मटका जुगार खेळताना आढळून आला त्याच्या कडून १,७६०- रोख रक्कम जप्त करण्यात आली
तसेच घडला खेड शहरातील , तिनबत्ती नाका, गांधी चौकचे मागे बंद टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली त्यामध्ये १,३४० रुपयांची रोकड जप्त करून निकेत नारायण हंबीर, वय ३५ वर्ष, रा. कळंबणी बुद्रुक, हंबीरवाडी, ता. खेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे










