राष्ट्र उभारणीसाठी माझा देखील हातभार हाच उद्देश ठेवून काम केले
भुईबावडा हायस्कूल येथे सौ. रावराणे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा संपन्न
स्वप्निल कदम l भुईबावडा :शाळा आणि विद्यार्थी माझ्यासाठी प्रिय होते. माझा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडला पाहिजे यासाठी मी नेहमी धडपड केली. राष्ट्र उभारणीसाठी माझा हातभार लावावा हाच एक उद्देश मनाशी बाळगून शिक्षण क्षेत्रात सेवा करण्याचे माझे उद्दिष्ट होते. रयत शिक्षण संस्थेत शैक्षणिक सेवेमध्ये खूप चांगली मोलाची माणसे मिळाली संस्थेने केलेले सहकार्य केव्हाही न विसरणारे आहे. शासकीय सेवा करत असताना कुटुंबाने केलेले सहकार्य यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकले असे भावनिक उद्गार आदर्श विद्या मंदिर भुईबावडा प्रशालेच्या मुख्याध्यापिका अमृता बाळकृष्ण रावराणे यांनी सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभात व्यक्त केले. 38 वर्ष शैक्षणिक प्रदीर्घ सेवेनंतर त्या सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त भुईबावडा हायस्कूल येथे त्यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर ग्रामस्थ व संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माजी विभागीय अधिकारी के.बी. मालुसरे यांनी सौ रावराणे यांच्या शैक्षणिक सेवेबद्दल कौतुक केले. यावेळी श्री मालुसरे म्हणाले की सौ रावराणे या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी माने म्हणून रयत शिक्षण संस्थेत रुजू झाल्या त्यांनी दिलेल्या शैक्षणिक सेवेचे कौतुक आहे. सौ रावराणे यांचे वडील माने गुरुजी यांचे संस्कार सोबत घेऊन सौ रावराणे यांनी आपल्या कामाचा ठसा विद्यार्थ्यांवरती उमटवला होता. शैक्षणिक सेवा देत असताना त्यांचे कुटुंब सुसंस्कृत असल्यामुळेच त्या आदर्शवत काम करू शकल्या. त्यांच्या कामाबाबत संस्थेने वेळोवेळी त्यांना कामाची पोचपावती दिली आहे त्याने संपूर्ण शिक्षण सेवेतून विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय दिला आहे असे मत श्री मालुसरे यांनी व्यक्त केले. यावेळी वैभववाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, वैभववाडी माजी सभापती लक्ष्मण रावराणे, मंगेश गुरव, प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, उद्योजक गिरीधर रावराणे आचिर्णे माजी सरपंच जयसिंग रावराणे, महेंद्र रावराणे, रुपेश रावराणे, सुधीर रावराणे, संजय साळुंखे, संदीप पाटील, मनोहर मोरे, संदीप मोरे, श्री फोंडके गुरुजी, विजय केळकर, रमाकांत मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास पाटणे, जिल्हा बँक मा. व्यवस्थापक विना रावराणे, सुभाष रावराणे, शशांक रावराणे, बी. आर. राजगे, एस.ए. घाडी, एम. आर. शेंडगे, के. एस. कांबळे, अक्षय मोरे, बाजीराव पाटील तसेच मोठ्या संख्येने भुईबावडा व आचिर्णे गावचे ग्रामस्थ, अमृता रावराणे यांचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सौ रावराणे यांचा उभयता सत्कार केला. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एस घाडी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बयाजी बुरान यांनी केले.









