पाकिस्तान प्रेम दाखवणाऱ्या तरुणाला आता भारत प्रेम समजणार

देशद्रोहाचा गुन्हा होणार दाखल

तरुण दाखल असलेल्या जिल्हा रुग्णालयात पोलिसांचे दंगा काबू पथक तैनात

रत्नागिरी ः प्रतिनिधी
भारतविरोधी तसेच समाजात तेढ निर्माण होईल असे धर्मविरोधी मोबाईल स्टेटस ठेवणार्‍या तरुणावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान रत्नागिरी शहरानजीक जांभूळ फाटा येथे या तरुणाचे ‘ऑपरेशन देशप्रेम’ पार पडल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

चार ते पाच जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवार 8 मे रोजी दुपारी 1 वा. सुमारास जांभूळफाटा येथे घडली.

पाकिस्तानबद्दलचे प्रेम आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दाखवणार्या तरुणाचे नाव मोहम्मद बदरुद्दीन परकार (21,मुळ रा.केजीएम प्लाझा गोवळकोट,चिपळूण सध्या रा.महादेवनगर,रत्नागिरी) असे आहे. त्याने बुधवारी रात्री आपल्या मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅपवरील स्टेटसमध्ये ’पाकिस्तान झिंदाबाद’ तसेच भारतविरोधी आणि धर्मविरोधी स्टेटस ठेवले होते. ही बाब त्याच परिसरात राहणार्‍या काही तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी गुरुवारी दुपारी मोहम्मद परकारला जांफूळफाटा येथे बोलावले होते. तो दुपारी 1 वा. सुमारास जांभूळफाटा येथे गेला असता त्या ठिकाणी आलेल्या चार ते पाच जणांनी त्याला स्टेटसबाबत जाब विचारले. तिथेच त्याच्यावर काही देशप्रेमी रत्नागिरीकरानी ‘ऑपरेशन देशप्रेम ‘ पार पाडले. यासाठी हाताचे ठोसे, लाकडाचाही वापर झाला. यात गंभिर दुखापत झालेल्या मोहम्मद परकारला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला असलेला धोका लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयात पोलिसांचे दंगा काबू पथक तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात देश विरोधी स्टेटस ठेवल्याप्रकरणी मोहम्मद परकार विरोधात भादंवि कायदा कलम 324 तसेच 153 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.