‘संगीत मत्स्यगंधा’ नाटक प्रमुख आकर्षण
पेडणे : प्रतिनिधी
मोपा येथील सातेरी (माऊली) चा १४ वा वर्धापन दिन सोहळा शनिवार १० ते मंगळवार १३ मे दरम्यान साजरा होत आहे. यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त शनिवार १० मे रोजी सकाळी ८.३० वाजता धार्मिक विधी, दुपारी १.३० वा. महाआरती, गाऱ्हाणे, तीर्थप्रसाद, दर्शन व महाप्रसाद होईल. सायंकाळी ७ वा. प्रसाद परब दिग्दर्शित ‘निराकार’ या लघुचित्रपटाचे प्रदर्शन होईल. रात्री ८.३० वा. पावणी, दीपोत्सव, पालखी व महाप्रसाद होईल. रविवार ११ मे रोजी सायंकाळी ७ वा. ग्रामस्थांचा भजनाचा कार्यक्रम व रात्री १० वा. तरुण हौशी नाट्य मंडळ मोपा यांचा प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘संगीत मत्स्यगंधा’ हे अजरामर नाटक होईल. नाटकाचे दिग्दर्शक पांडुरंग पांगम, संगीत दिग्दर्शक नाना आसोलकर, तालरक्षक अमर मोपकर, पार्श्वसंगीत सत्यवान नाईक यांचे आहे. नाटकात राजेंद्र नाईक, संदेश शेट्ये, उमेश नाईक, हर्षद सावंत, संदेश नाईक, खेमराज राऊळ, शारदा शेटकर व समिता नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सोमवार १२ मे रोजी सायंकाळी ७ वा. भजनाचा कार्यक्रम, रात्री १० वा. श्रीदेवी सातेरी माऊली पंचायतन देवस्थान आणि श्री सातेरी माऊली प्रसादिक नाट्य मंडळ मोपा यांचा ‘दिवाळी’ हे विनोदी मालवणी नाटक होणार आहे. मंगळवार १३ रोजी सायंकाळी ७ वा. भजनाचा कार्यक्रम, रात्री १० वा. श्री देव वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा ‘अघोर लक्ष्मी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी माऊली पंचायतन देवस्थान मोपा व समस्त ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
———–












