वालावलकर रुग्णालयातील न्यूरो सर्जरी विभाग ठरतोय रुग्णांसाठी वरदान

चिपळूण (प्रतिनिधी) : केवळ १२ वर्षाची मनिषा अगदी लहानपणापासून तशी तब्बेतीने बारीकच. मुळातच जन्मताच तिला नवजात शिशु अतिदक्षता विभागात बरेच महिने जीवांची झुंज लढावी लागली होती आणि आता काही दिवस तिला सतत उलट्या होत होत्या. काहीही खाल्लेले पचत नव्हते. बऱ्याच डॉक्टरनी उपचार केले, सलाईन दिले पण व्यर्थ. शेवटी शरीरातील मीठ कमी झाले. परिस्थिती गंभीर झाली .मनिषा अगदी श्वास सुद्धा घेऊ शकत नव्हती अशा अवस्थेत कुटुंबीयांनी सांगितल्यामुळे वालावलकर रुग्णालयात दाखल झाली.

तिच्या सर्व तपासण्या केल्या आणि त्यात तिच्या मेंदूत एक गाठ सापडली. ही गाठ मेंदूवर दाब देत असल्याने उलट्या होऊन वजन घटले होते. मग काय ताबडतोब न्यूरो सर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया क्लिष्ट होती कारण गाठ दृष्टीच्या केंद्रावर दाब देत होती. त्यामुळे ऑपेरेशन करताना जर त्या केंद्रावर इजा झाली तर दृष्टी जाण्याचीही दाट शक्यता होती. आणि मनिषाची तब्बेत तर अतिशय नाजूक झाली होती. न्यूरोसर्जन भूलतज्ज्ञनही आपले प्रयत्न पणाला लावत होते. पण रुग्णालयातील मॉड्यूलर ऑपरेशन कक्ष, ऑपरेटिंग मिक्रोस्कोप, अद्ययावत यंत्रणा व निष्णात डॉक्टर यांच्या कौशल्यामुळे मेंदूतील गाठ इतर भागाला इजा न करता सुरळीत काढली गेली.

शस्त्रक्रियेनंतर आता मनीषा पुन्हा जागी होऊन प्रतिसाद देईल का, तिची दृष्टी अबाधीत असेल का ह्याची उत्सुकता सर्वांची होती. पण हळूहळू मनिषाची प्रगती दिसू लागली. ती संवाद साधू लागली, तिच्या दृष्टीवर काहीही परिणाम झाला नाही. वजन वाढले आणि आता तर ती शाळेतही जाऊ लागली आहे. हे सर्व उपचार करताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ देखील तिला मिळाला.

अशाप्रकारे मनिषाला जीवनदान तर मिळालेच पण गेल्या काही महिन्यात अशा अनंत रुग्णांना मेंदू विकारांपासून मुक्तता या न्यूरो सर्जरी विभागामुळे मिळाली आहे. सामान्यपणे मेंदूचे आजार म्हटले कि एक प्रकारची भीती मनात असते कारण मेंदू हा आपल्या शरीराचं रिमोट असल्या सारखेच आहे. आणि त्यालाच इजा झाली तर आयुष्य पणाला लागते. ह्या वर त्वरित उपाय आणि ऑपरेशन झाले नाही तर रुग्ण कायमचा कोमात जाण्याची शक्यता असते. ह्याचा विचार करून वालावलकर रुग्णालयाने न्यूरोसर्जरी विभाग स्थापन केला गेला त्याच बरोबर त्या विभागाशी संलग्न आणि आवश्यक सुविधा जसे कि एम आर आय, सी टी, डिजिटल सब ट्रॅक्शन अँजिओग्राफी अश्या सर्व सोयी आधीच उपलब्ध असल्याने काम सोपे झाले. आणि मृदुल भटजीवाले आर डी एन बी न्यूरो सर्जन यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे अपघातामुळे मेंदू रक्तस्त्राव गाठी, मेंदूची हाडे तुटणे, मणक्यातील गाठी मुळे होणारा लकवा, मेंदुतील रक्ताच्या गाठी ज्याला अन्यूरिझम म्हटले जाते, मेंदूतील पाण्याचा दाब वाढणे, कोकणातील दऱ्या खोऱ्या डोंगर उंच झाडे अशा भौगोलिक परिस्थितीत झाडावरून पडणे अश्या अनंत रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य झाल आहे.

विशेष म्हणजे १० ते ३० वषे वयातील १२ तरुण रुग्ण आणि बालके यांच्या मेंदूवर त्वरित शस्त्रक्रिया झाल्याने त्याचे प्राण वाचवता आले. तसेच ३१ ते ५० वयोगटातील ३७ रुग्णावर ओपेशन करून आजारापासून सुटका करण्यात आली आणि ५० हुन अधिक वयाच्या रुग्णामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब आणि मेंदूतील आजार असूनही ५८ रुग्णांना जीवनदान मिळाले. यातील अनेक रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाल्यामुळे आर्थिक दृश्य निर्बल रुग्णांनाही पुन्हा जगण्याची संधी प्राप्त झाली आहे.